..शिवजयंती निमित्त व राजे क्लबच्या वतीने शेवाळवाडी व मांजरी परिसरातील ५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व... : संस्थापक अध्यक्ष अमित पवार..
सुनिल थोरात (महाराष्ट्र संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजे क्लब या सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली आहे.
शिवजयंती निमित्त व राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमित पवार त्यांनी एक आगळी वेगळी म्हणजे विद्यार्थींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन शिवजयंती साजरी करण्यात आली.
मांजरी व शेवाळवाडी परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये. आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च या संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी मुलांच्या मुलाखती घेण्यात येत आहे. त्यामध्ये त्यांची शिक्षणाची आवड, वागणूक आणि घरची परिस्थिती याबद्दलची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. प्रत्येकी ३-३ महिन्यांनी या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा त्यांच्या शिक्षकांकडून व पालकांकडून घेण्यात येणार आहे. त्याच बरोबर मुलांना वेळोवेळी राजे क्लबच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
चौक संस्कृती मुळे लहान मुलांचे नुकसान होताना दिसत आहे आणि नकळत त्यांचा कल गुन्हेगारीकडे वळताना दिसतो. शिक्षण आणि योग्य मार्गदर्शनामुळे या लहानग्यांचे भविष्य समृद्ध होऊ शकते यासाठीच केलेला हा छोटासा प्रयत्न आहे असे राजे क्लब चे संस्थापक अध्यक्ष व शेवाळवाडीचे माजी उपसरपंच अमित पवार सांगितले.
या उपक्रमासाठी लगीर झाला जी फेम अभिनेता निखिल चव्हाण यांनी ५ मुलांचे पालकत्व स्विकारून एक आदर्श ठेवला. व राजे क्लबच्या या उपक्रमात सहभागी झाले.
या उपक्रमासाठी राजे क्लब च्या वतीने संजू पडवलकर, सागर बनकर, संतोष कदम, नरेंद्र चव्हाण, विशाल बावणे, सागर भापकर, दीपक ढोरे, आकाश पवार, विकी धालगडे, रवी गोगड, सुधीर नांदुरकर, सनी बिल्लाडे, सागर नाटिकर, सुजित गपाट, रोहित खेडेकर, नवनाथ साळुंखे, सुधीर गायकवाड, अतुल म्हस्के, उमेश पावणे, सुरज जगताप, विराज बोडके, अंबादास गर्जे, राजू डोके, किशोर गवळी, आर्यन पवार, आशु शिंदे, अभिषेक मिंढे, अक्षय मिंढे, विष्णू शिंदे, अभिजित शिवरकर, मंगेश मोरे, रोहित तुपे, राज डांगे, सौरभ पवार, वैभव चव्हाण, विजय धायगुडे, विनोद कांबळे, समर्थ मलकापूर, निखिल राठोड, आदित्य मोहिते, विशाल मोहिते, योगेश देंडगे, विक्रम कापरे, ऋषी पडवलकर, राहुल सोनावणे आदी सदस्य नियोजन करत आहेत.

Post a Comment