सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निकाडणुकीचे पडघम वाजले. २०२४ लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या उरुळी देवाची व वडकी ग्रामपंचायत हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी, लोणी काळभोर पोलिसांचे शुक्रवारी पथ संचलन काढले होते.
वडकी गावठाणापासून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पथ संचलनाला सुरुवात केली. त्यानंतर हे संचलन वडकी नाला, वडकी फाटा व १० वा मैल व पुढे उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत डॉ. आंबेडकर चौक व या दोन्ही गावातील मंदिरे, मस्जिद या ठिकाणी येऊन थांबली.
या पथ संचलनाचे आयोजन लोणी काळभोर पोलीस व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
जमाजात समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच पोलीस मदतीसाठी ११२ या नंबर क्रमांकवर कॉल करून संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना पथ संचलना दरम्यान करण्यात येत होते.
या वेळी हडपसरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाखेचे दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाणे, रवी आहेर, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment