...नारीशक्तीचा सन्मान ...
गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील गावचे व पंचक्रोशीचे नाव लौकिक मिळवला.
रुपाली माळवदे, दिपाली माळवदे या माळवदे भगिनींनी एकाच वेळी सरकारी नोटरी झाल्या असल्याने लासुर्णे परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तसेच याच गावची कन्या किर्ती वाघमोडे, हिने यश संपादन करून ग्राम महसूल अधिकारी पदी वर्णी लावत गावाचे व घराण्याचे नाव लौकिक केले आहे.
विशेष म्हणजे माळवदे भगिनी या गावतील पहिल्या महिला वकील व पहिल्या महिला नोटरी आहेत. या मुलींचा भारतीय जनता पक्ष व सामाजीक संघटनेच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे,भाजपा अनुसूचित मोर्चा जिल्हा सचिव नेताजी लोंढे, रविराज भाळे, तुकाराम वाडकर, पांडुरंग सुळ, अक्षय चव्हाण, सनी देवकाते, सतिश सरगर, पपू चव्हाण, शेकलाल घोरपडे, राजेश माळवदे, सौरभ शिरसागर या सह ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment