शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सहाय्यक पोलीस निरीक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या : परळी

..धक्कादायक कारण आले समोर, परळीत सहाय्यक पोलीस निरीक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या, शरीराचे झाले दोन तुकडे..





बीड : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील मुख्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेत (CID) नेमणुकीस असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने बीडमध्ये जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे.


           सुभाष दुधाळ असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे, रेल्वेखाली उडी घेतल्यानंतर त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. ही घटना बीडच्या परळी रेल्वे स्थानकात ही घडली आहे. अद्याप कुठलीही कारण. समोर आले नाही. 



            या संदर्भात अधिक माहिती अशी की, सुभाष दुधाळ यांची काही दिवसांपूर्वीच बीडमधून पुणे येथे सीआयडीमध्ये बदली झाली होती. दुधाळ यांनी सीआयडीमध्ये हजर झाल्यानंतर १० दिवसांची रजा टाकली होती. त्यानंतर ते बीड येथे गेले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह बीड जिल्ह्यातील परळी येथे रेल्वे रुळावर दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर स्थानिक लोहमार्ग पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.


              त्यानंतर दुधाळ यांचा मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांची तपासणी करण्यात आली असता त्यावेळी त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये 'सुभाष दुधाळ, पीआय, सीआयडी, व्हीडब्ल्यूटी), मी कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या करीत आहे.' असे लिहिलेले होते. तर दुसऱ्या कागदावर घरचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक लिहिलेला होता. सुभाष दुधाळ यांच्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post