..जोपर्यंत सगेसोय्यांच्या मुद्द्याची अंमलबजावणी नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेश नाही;..
पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पुन्हा मराठा समाज आक्रमक होण्याची चिन्हं पहायला मिळण्याची शक्यता आहे.
त्याच अनुषंगाने इंदापूर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा समाज पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघातमध्ये येत असल्याने या मराठा आंदोलनाचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांना बसला. इंदापुर तालुक्यातील कांदलगाव या ठिकाणी लावण्यात आलेले त्यांचे पोस्टर्स आंदोलकांनी हटवले आहेत.
जोपर्यंत राज्य सरकारकडून सगेसोयऱ्याच्या मुद्द्याची अंमलबजावणी होत. नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना गावात फिरू देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
बारामती तालुका आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयऱ्यांच्या मुद्द्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment