शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सभासद ठरवणार यशवंतचा कारभारी कोण?... थेऊर

..मतदानाच्या रणधुमाळी नंतर यशवंत चा कारभारी ठरणार; व्हिजन, विकास, शेतकरी हित यासाठी कारभारी ठरणार.. यशवंत चा....



सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 

पुणे (हवेली) : अखेर रणधुमाळी संपली. मतदान संपले. पुणे जिल्ह्यास हवेली तालुक्याचे थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आज शनिवारी (ता.९) लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि केसनंद या मतदान केंद्रावर पाडली.


           एकुण मतदान संख्या जवळपास २१ हजार होते. त्यापैकी ११४१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर ब वर्ग सोसायटी गटात २३८ इतके मतदान झाले. लोणी काळभोर येथील मतदान केंद्रावर ८० ते १०५ वर्षापुढील नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. यात लोणी काळभोर येथील शकुंतला रामचंद्र काळभोर वय ८६वर्ष तर फुरसुंगी येथील मारुती धोंडिबा पवार वय १०० वर्ष यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उन्हाचा तडाखा असुन देखील सभासदांनी मतदान करण्यास पसंती दिली आहे.

  

    ‌‌   उरुळी कांचन येथील मतदान केंद्र क्र. १ मध्ये १८३७ व २ मध्ये १८९०  हे डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मेडियम स्कूल याठिकाणी मतदान झाले. लोणी काळभोर येथील मतदान केंद्र क्र. ३,४ व ५ गटांमध्ये ५४५२ मतदान हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.१,२ व ३ येथे संपन्न झाले. तर केसनंद येथील केंद्रावर क्र. ६ व ७ येथे एकुण मतदान २२३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .

 

           लोणी काळभोर येथील मतदान केंद्रावर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार रामदास मेमाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


    ‌    “यशवंत” ची सत्ता आपल्याच गटाच्या ताब्यात यावी, यासाठी सत्तेच्या रणांगणात उतरलेल्या अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन्ही पॅनेल प्रमुखांनी हायटेक प्रचार यंत्रणा वापरली.  तसेच ६० वर्षांवरील १३६८३ (६५ टक्के) मतदार आहेत. म्हणजे ६० वर्षांवरील मतदारांचा कल ज्या पॅनेलकडे झुकणार आहे, तो पॅनेल सहजपणे निवडून येणार असून यशवंतचे भवितव्य मतपेटीत बंद त्यामुळे अनेक उमेदवारांची धाकधुक वाढली.


             आज झालेल्या मतदानात मतदार राजा यशवंत चा कारभारी कोण हे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post