शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे बारामती लोकसभा मतदार संघात वैद्यकीय मदतकार्य सुरू..

 ..बारामती येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पहिल्या कक्षाचे उदघाटन..



पुणे (बारामती) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारामती लोकसभा मतदार संघातील नागरिकांसाठी वैद्यकीय मदतकार्य सुरू करण्यात आले असून पहिला वैद्यकीय मदत कक्ष बारामती येथे स्थापन करण्यात आला.


            संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.


             आपल्या मतदार संघातील गोरगरीब नागरिकांना राज्य तसेच केंद्र सरकारच्या आरोग्य विषयक योजनांची माहिती व्हावी, त्याचा लाभ घेता यावा, शासकीय कार्यालयांत हेलपाटे न मारता आपल्या भागातच आवश्यक कागदपत्रे कोणती असावीत, त्या कागदोपत्री पूर्तता करता याव्यात आदी बाबी या कक्षाच्या माध्यमांतून नागरिकांना सहज आणि सोप्या पद्धतीने समजवून सांगितल्या जात आहेत. त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.



           राज्य शासनातर्फे आजारी व्यक्तींना दिला जाणारा मुख्यमंत्री सहायता निधी, केंद्र शासनाचा पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, याशिवाय धर्मदाय रुग्णालयांकडून मदत मिळवून देणे, गरज पडल्यास बिलातून सवलत मिळवून देणे अशाप्रकारची कामे या कक्षाच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात बोलताना सांगितले. 


           राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय मदत कार्याच्या कक्ष समन्वयक पदी यावेळी भूषण सुर्वे यांची निवड केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, वनिता बनकर, दिपाली पवार, राहुल नाकाडे, दत्ता खरात यांच्यासह बारामती शहरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post