....शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने गणराज पार्क येथे अक्षय ब्लड सेंटर यांच्या वतीने रक्तदान शिबीर व पुर्व हवेली असोसिएशन यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न....
सुनिल थोरात (महाराष्ट्र संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : पुर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील गणराज पार्क येथे शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने लोक उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत असतात. त्याच अनुषंगाने शंभूराजे प्रतिष्ठान दरवर्षी प्रमाणे यावर्षी पुरंदर येथून जोत आणण्यात आली. शंभूराजे यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी दि. १४/०५/२०२४ रोजी गणराज पार्क येथे पुर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन मार्फत विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर दुपारी ३:००ते ६:०० वाजेपर्यंत संपन्न झाले.
सर्व रोग उपचार तपासणी, हाडा संबधीत तपासणी व उपचार, हाडांची घनता तपासणी, दंत संबंधित तपासणी व उपचार, फिजिओथेरपी मार्गदर्शन, रक्तातील साखर तपासणी, व रक्तदाब तपासणी, करण्यात आली.
वरील तपासणीसाठी पुर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ नितीन मटकर, उपाध्यक्ष डॉ नितीन तांदळे, खजिनदार डॉ सुनिल गायकवाड, डॉ राहुल काळभोर, डॉ किरण कुदळे, डॉ मंजीरी कुदळे, डॉ संदीप सरडे, डॉ सुयोग काळभोर डॉक्टर संतोष गायकवाड. डॉक्टर संजय माने सर. व इतर स्टाफ हजर होते.
तसेच ब्लु क्राॅस कंपनी मार्फत रक्तातील साखर, व रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आली. यासाठी विजय तमखाने, सिद्धेश गुजर, रामेश्वर म्हात्रे, अविनाश सुरवशे, हे उपस्थित होते. तसेच हाडांची घन तपासणी (BMD) ही. सुयोग सरांच्या मार्गदर्शनाखाली संदेश राऊत यांनी उपलब्ध करण्यात आली.
रक्तदान शिबीर सकाळी ११:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत अक्षय ब्लड सेंटरचे संचालक अविनाश जोशी यांच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण टिमने सर्व प्रकारचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले.
या शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या डॉक्टर व रक्तदान च्या टिमचे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने निगडीकर, लोहकरे, अनिल माने, अनिकेत चौधरी, महेश पवार, आदित्य बोलभट, अथर्व (साई) खामकर, ओंकार खामकर, प्रतिक पवार, स्वप्नील कळसकर, रवी चव्हाण, आयुष घाडगे, प्रथमेश पवार, प्रथमेश गाडेकर, समीर शिंदे, आदित्य बिराजदार, यश कुंभार, विलास कोळी, विनायक वरबडे, अभिनव गायकवाड, तेजस येडे पाटील, राजेश येडे पाटील, मयांक खामकर, तन्मय कोळी, ऋतुल कोळी, निखिल थोरात, अथर्व खामकर, भागवत अदलिंगे, मनिरुद्र शिंदे या सर्वा तर्फ आयोजन व सत्कार करण्यात आले.
यावेळी शंभूराजे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक संजय कळसकर, अतुल खामकर, नितीन टिळेकर, जयवंत शिंदे, निलेश मिश्रा यांच्या माध्यमातून उत्तम नियोजन करण्यात आले.
विशेष सहकार्य ज्ञानेश्वर माऊली काळभोर यांचे लाभले.
तसेच रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी साठी टेबल, खुर्च्या व इतर साहित्य (टिळेकर मंडप) हेमंत टिळेकर यांनी मोफत देण्याची व्यवस्था केली त्याचे ही शंभूराजे प्रतिष्ठान तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने या जयंती साठी सहयोग लाभलेल्या गणराज पार्क सभासदांचे आभार व्यक्त करण्यात आले.












Post a Comment