..बारामतीमध्ये विमानतळावर फिरायला गेलेल्या मित्र व मैत्रिणींना दोन अज्ञात व्यक्तीने लुटले व त्यांचे कपडे काढून फोटो काढले...
डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (बारामती) : बारामती परिसरात दुसऱ्या महिन्यातील चौथी घटना. बारामती परिसर गुन्हेगारीचा अड्डा झालाय की काय अशी शंका बारामती करांमध्ये येत आहे. पोलीस करतात तरी काय पोलीसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. बारामतीकरांमध्ये भिंतीचे वातावरण आहे.
अशीच एक घटना शुक्रवारी बारामती घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक प्रेमी युगुल गाडीमध्ये गप्पा मारत असताना त्यांना दोघा अज्ञातआरोपींनी अगोदर त्या दोघांना लुटले व नंतर दमदाटी करत दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावले. या घटनेने अज्ञात इसमाने समाधान झाले नाही त्यांनी कपडे नको त्या अवस्थेत फोटो काढून घेतले. आणि हे फोटो व्हायरल कारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञाताने युवतीच्या अंगावरील ९० हजारांचे दागिने बळजबरीने लांपास केल्याचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोजवावी हद्दीत बारामती विमानतळा जवळ ही घटना घडली. बारामतीत शिकत असलेल्या तरुणी व मित्रासह बारामती विमानतळाच्या परिसरात फिरण्यासाठी गेले असता गाडीत गप्पा मारत बसलेल्या या दोघांना ३० ते ३५ वयोगटातील दोन व्यक्तींनी हटकले व तिच्या गळ्यातील सोनसाखळी व कानातील दागिने असा ९० हजारांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर तिच्या मित्राला दगडाने मारहाण करत दोघांनाही गाडीतून बाहेर काढले व एका खड्ड्यात नेऊन अंगावरील कपडे जबरदस्तीने काढायला लावून त्यांचे त्या अवस्थेत फोटो काढले. त्यानंतर तीच्याच फोनवरून कोणालातरी फोन करून तुला फोटो पाठवले आहेत. बघून घे असे सांगितले. या वरून संबंधित तरुणीने बारामती पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दोघा अज्ञात गुन्हेगारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मात्र या घडलेल्या घटनेने बारामतीत खळबळ उडाली असून बारामतीतील वाढती गुन्हेगारी चिंताजनक बनली असल्याचे यातून दिसत आहे याचा तपास निरीक्षक राहुल घुगे करत आहेत.

Post a Comment