शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शंभू राजे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबीर : गणराज पार्क

 शंभू राजे यांच्या जयंतीनिमित्त गणराज पार्क येथे अक्षय ब्लड बॅक यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर व पुर्व हवेली डॉक्टर असोसिएशन यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित.....



सुनिल थोरात (महाराष्ट्र संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हवेली) : पुर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील गणराज पार्क या सोसायटीत २०१७ पासून शंभूराजे यांची जयंती साजरी करण्यात येते 

           

            सालाबाद प्रमाणे मंगळवार दि. १४/०५/२०२४ रोजी शंभूराजे जयंती साजरी करत असताना शंभू राजे प्रतिष्ठान गणराज पार्क येथे मोठ्या उत्साहात शंभूराजे जयंती साजरी करत आहे.

   

         जयंतीनिमित्त दरवर्षी  छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या पुरंदर ठिकाणी शंभू राजे प्रतिष्ठान यांचे सभासद नतमस्तक होऊन जोत गणराज पार्क येथे आणून शंभू राजे यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते.


          आपण ही  समाजाचे देणे लागतो या अनुषंगाने शंभू राजे प्रतिष्ठानचे सल्लागार संजय कळसकर, नितीन अण्णा टिळेकर, आनंद खामकर मार्गदर्शक अतुल खामकर, जयवंत शिंदे,  विशेष सहकार्य ज्ञानेश्वर (माऊली) काळभोर व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत यावर्षी भव्य रक्तदान शिबीर अक्षय ब्लड सेंटर यांचे डायरेक्टर अविनाश जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे. तसेच व पुर्व हवेली डॉक्टर असोसिएशन यांच्या सहकार्याने ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, हाडांची घनता तपासणी व इतर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 


         या तपासणी साठी पुर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून डॉ नितीन मटकर, डॉ सुनिल गायकवाड, डॉ राहुल काळभोर, डॉ नितीन तांदळे, डॉ सुयोग काळभोर, डॉ ओमकुमाल हलिंगे, डॉ संदीप सरडे, डॉ संतोष गायकवाड या तज्ञ वैद्यकीय डॉक्टर यांच्या मार्फत आरोग्य तपासणी  मार्गदर्शन लाभणार आहे.


            शंभू राजे प्रतिष्ठानची जयंती साजरी करण्यासाठी गणराज पार्क सोसायटीतील सर्व मुले, तरुण व वयस्कर यामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात. 



             शंभू राजे प्रतिष्ठानच्या आयोजकांकडून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीरचा गणराज पार्क व परिसरातील निसंकोचपणे लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post