बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना कोळी समाजाचा जाहीर पाठींबा...
डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार, इंदापूरचे माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संजय कोळी यानीं इंदापूर तालुका, सणसर, शेळगाव दौर्यात लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना कोळी समाजाने शेळगाव येथील सभेत जाहीर पाठींबा दिला.
यावेळी कोळी समाजाचे जिल्हा अध्यक्ष गोविंद गायकवाड, पिंपरी चिचंवडचे तालुका अध्यक्ष मोतीबेन, इंदापूर तालुक अध्यक्ष सचिन कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड व सर्व तालुका अध्यक्ष व कोळी समाज बांधव उपस्थित होते.


Post a Comment