अवैध ताडी वाहतुक व गोडाऊन वर राज्य निरिक्षक उत्पादन शुल्क चा वालचंदनगर ता. इंदापूर येथे छापा..
डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (दौंड) : लोकसभा निवडणूक संदर्भात गस्त सुरू असताना विजय रोकडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मौजे वालचंदनगर गावच्या हद्दीत प्रकाश शामराव भंडारी (रा. रणंगाव) हा अवैध ताडी साठवून विक्री उद्देशाने वाहतूक करणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळालेने त्यांनी तात्काळ जवान केशव वामने यांना दोन पंच बोलविण्यास सांगून स्टाफ व दोन पंच यांना सोबत घेऊन माहिती मिळाले त्या ठिकाणी जाऊन सकाळी ९ वाजता नाकाबंदी केली असता सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास एक होंडा ॲक्टिवा गाडी थांबवुन तपासणी केली.
तपासणी दरम्यान ३ प्लास्टिक ३५ लिटर क्षमतेच्या डपकी मघ्ये एकुण १०५ लिटर अवैध ताडी मिळुन आली. गाडी चालक प्रकाश भंडारी कडे चौकशी केली असता त्यांने दिलेल्या माहितीनुसार लोहार वस्ती टावर कालनी जवळ त्याचे ताब्यातील रुम मध्ये तपासणी केली असता अवैध ३०० लिटर ताडी आढळून आली. चौकशी नंतर ४०५ लिटर ताडी व दुचाकी सह एकूण ८६२७५ / रु चा मुद्देमाल मिळून आला असून, सदर ठिकाणी मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रकाश शामराव भंडारी (रा- रणंगाव ता. इंदापूर जि. पुणे) यांस घटनास्थळी अटक करण्यात आली त्याच्या विरोधात दारू बंदी अधिनियम कलम ६५(अ)(इ)८१,८३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अधीक्षक चरणसिंग राजपुत, उपअधीक्षक उत्तम शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली दौंड राज्य उत्पादन शुल्क चे निरीक्षक विजय रोकडे, सहायक फौजदार दत्ता गवारे, जवान केशव वामने, नवनाथ पडवळ, चंद्रकांत इंगळे, यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड विभाग विजय रोकडे करीत आहेत

Post a Comment