प्रतिनिधी : गुलाब शेख
आज नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी नांदेड येथे विधानसभेच्या निवडणुकीबाबत जिल्ह्यातील पूर्वतयारीच्या आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीच्या संदर्भात आज नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली... या बैठकीस खासदार वसंतराव चव्हाण हे आले असता त्यांचे स्वागत करुन सत्कार करते वेळेस नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यावेळी.. आमदार मोहन अण्णा हंबर्डे, जिल्हाध्यक्ष बी आर कदम, अब्दुल सत्तार(महानगराध्यक्ष), शाम दरक(महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहसचिव), मसूद खान (माजी उपमहापौर), कार्याध्यक्ष शमीम भाई, कार्याध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, प्रफुल सावंत, एकनाथ मोरे, सुरेश हटकर (जिल्हाध्यक्ष मागासवर्गीय सेल) व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 11 ऑगस्ट रोजी नांदेड येथे विधानसभेच्या निवडणुकीबाबत आढावा बैठक
maharashtrapolicenews24@gmail.com
0

Post a Comment