शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

जेजुरी खंडोबा मंदिर महाद्वार मार्गांवरील खड्ड्यात वृक्ष लावून केला जाहिर निषेध, खंडोबाची जेजुरी कि खड्ड्याची जेजुरी

जेजुरी प्रतिनिधी : ..........

जेजुरी खंडोबा मंदिर महाद्वार मार्गांवरील खड्ड्यात वृक्ष लावून केला जाहिर निषेध, खंडोबाची जेजुरी कि खड्ड्याची जेजुरी केला सवाल महाराष्ट्राचे कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या नदी चौक महाद्वार रस्त्यावर भल मोठा खड्डा पडलेला निर्देशनात येऊनही बुजावला न गेल्याने संतप्त वंन्दे मातरम संघटना कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत गांधींगिरी स्टाईल ने खड्ड्यात वृक्ष लावून पालिका प्रशासनाचा जाहिर निषेध केला आहे वास्तविकता जेजुरी खंडोबा मंदिर लाखो भविकांचे श्रद्धा स्थान असुन दररोज विविध जिल्ह्यातून नव्हे तर देश विदेशातून भाविक पर्यटक येत असतात मंदिरच्या प्रमुख रस्त्यावर च घाणीचे साम्राज्य तर असतेच पण पावसाचे पाणी साचून मोठा खड्डा पडला होता त्यातच येजा करणाऱ्या गाड्या तसेच भाविक खड्डा चुकवत जात असत तर काही त्या खड्ड्यात पडत असत हि गोस्ट संघटनेच्या निर्देशनात येताच गांधींगिरी पद्धतीने वृक्ष लावत आणि भंडारा उधळत वंन्दे मातरम संघटना जिल्हा अध्यक्ष जहीर मुलाणी, रसिक जोशी विक्रम माळवदकर,श्रीकांत पवार अनिकेत हरपले, प्रवीण आवळे,ग्रांमस्थ सागर दरेकर, यशवंत दोडके यांनी पालिका प्रशासनाच्या मनमानी आणि भोंगळ कारभारा विरोधात घोषणा देत खंडोबाची जेजुरी का खड्ड्याची जेजुरी असा सवाल केला आहेे
 खंडोबा देवाचा नदीचौक परिसर नेहमीच अस्वच्छ अवस्थेत आढळून येतो पालिका प्रशासनाचे ठेकेदार कामगारांवर नसलेले नियंत्रण आणि दुर्लक्ष यामुळे भविक नागरिकांचे हाल होत आहेत संपूर्ण राज्यातून येणाऱ्या भविकांना घाणीत तर कधी खड्ड्यात पाय जाऊन देवदर्शनाल जावे लागत आहे हा प्रत्यक्ष जेजुरीकरांचा खेळ खंडोबाच सुरु आहे

Post a Comment

Previous Post Next Post