महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे
कोल्हापूर दि. २३ जुलै/
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकरवादी) बुधवार दि. 24 जुलै रोजी दुपारी १२.०० वाजता दसरा चौक, शाहू महाराज पुतळा येथे आत्मक्लेष आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सर्व आंबेडकरवादी समाज, पक्ष, संघटना आणि समाजवादी, परिवर्तनवादी, संविधान प्रेमी, पक्ष, संघटनांनी उपस्थित राहून विशाळगड येथील हिंसेचा व प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या पश्चिम महाराष्ट्र म. आ. अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी केले.
न्यायालयाचा आदेश आणि सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमण प्रश्नी अक्षम्य दुर्लक्ष केले. परिणामी अतिक्रमण निर्मूलन आंदोलनाचे रूपांतर सामाजिक, धार्मिक हिंसेमध्ये झाले. या घटनेमुळे रयतेचे राजे शिवाजी महाराज, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, क्रांतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या विचारांची मोडतोड होऊन, संपूर्ण महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक, दलित आणि छोटा समुदाय प्रचंड दहशतीमध्ये जगत आहे. कोल्हापूरची पुरोगामी प्रतिमा या घटनेमुळे मलिन झाली आहे, निष्पाप, बेकसूर कुटुंबीयांवर हिंसक हल्ले करून धार्मिक स्थळांची सुद्धा मोडतोड झालेली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. प्रशासनाच्या या कचखाऊ आणि राजकीय दबावाला बळी पडण्याच्या भूमिकेमुळे समाजविघातक शक्तींना बळ दिले गेलेले आहे. म्हणून या सर्व घटनेचा तीव्र निषेध होणे आवश्यक आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक कायदेशीर आणि लोकशाहीवादी भूमिकेवर काम करणाऱ्या सर्वच समाज, पक्ष, संघटना यांना आणि संविधान प्रेमी जनतेला याचा प्रचंड मनस्ताप झालेला आहे. म्हणून विशाळगड येथील हिंसक घटना व ही हिंसा रोखण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाचा आम्ही निषेध करत आहोत. *वेळीच या व अशाच जातीय आणि धार्मिक हिंसाचाराला आळा घातला पाहिजे अन्यथा कोल्हापूरचा मणिपूर झाल्याशिवाय राहणार नाही.* म्हणून आम्ही आत्मक्लेश आंदोलन करीत आहोत.
तरी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करत आहे.
@ निमंत्रक @
*रूपाताई वायदंडे*
*अध्यक्षा - पश्चिम महाराष्ट्र म. आ.*
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकरवादी)*

Post a Comment