शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांची दि . 8 / 8 /24 रोजी कुर्डूवाडी कारखान्याचे अध्यक्ष महेंद्र जगताप यांनी त्यांच्या निवास स्थानी भेट

 

प्रतिनिधी  / राजकुमार तगारे

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांची दि . 8 / 8 /24 रोजी कुर्डूवाडी कारखान्याचे अध्यक्ष महेंद्र जगताप यांनी त्यांच्या निवास स्थानी भेट घेऊन मा गडकरी साहेब तिसऱ्यादा रास्ते वाहतूक मंत्री झाल्या बद्दल कुर्डूवाडी व माढा मतदारसंघाच्या वतीने सत्कार केला .
 कुर्डूवाडी च्या जिव्हाळ्याची  व महत्त्वाची मागणी म्हणजे कुर्डूवाडी रेल्वे गेट नंबर 38 वर उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी अध्यक्ष महेंद्र जगताप यांनी  मा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांना आपले पत्र देऊन केली .मा आठवले साहेब यांनी मा नितीन गडकरी साहेब यांना निवेदन पाठवून दिले 
  त्या आगोदर महेंद्र जगताप यांनी मा गडकरी साहेब यांच्या आँफीस अधिकारी यांची भेटून  दि 7/ 8 / 24  निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली व उड्डाण पुलाचे काम का सुरू झाले नाही त्या त्या अधिकारी यांनी असे सांगितले की मी आपणांस माहिती घेऊन सांगतो .
  परंतु आज दि 8 / 8 / 24 रोजी सध्याकाळी 8 वाजता मा गडकरी साहेबांनी  अध्यक्ष महेंद्र जगताप यांना असे आश्वासन दिले की काळजी करू नाकोस लवकर तुमच्या रेल्वे गेट नंबर 38 उड्डाण पुलाचे काम चालू होईल 
  हे यश सतत मा गडकरी साहेब यांच्या कडे पाठपुरावा केल्या मुळे या प्रश्नाला यश मिळाले आहे .
 या वेळी अध्यक्ष महेंद्र जगताप . सोबत एम जे शेख .अनिकेत डोंगरे [ मुंबई  ] या वेळी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post