शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

दलित हत्याकांडातील विरोधात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देत जबाब दो धरणे आंदोलनाची सांगता



दलित हत्याकांडातील विरोधात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देत जबाब दो धरणे आंदोलनाची सांगता

: आंदोलक भीमसैनिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना न्यायमागण्यांचे निवेदन

महाराष्ट्र पोलीस न्यूज उपसंपादक गुलाब शैख

लातूर :  लातूर जिल्ह्यातील दलित हत्याकांडांच्या घटनांमधील आरोपींविरुद्ध खूनाचे व अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सीआयडी मार्फत चौकशी करून सदरील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी व मयत दलित युवक,  विद्याथ व अत्याचारीत युवकांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आदी मागण्यासाठी 6 ते 8 ऑगस्ट पर्यंत लातूर येथील महात्मा गांधी चौकात सुरु असलेले जबाब दो धरणे आंदोलनाची सांगता आज 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रचंड घोषणाजीत करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित दलित नेत्यांनी दलित हत्याकांड व अत्याचाराच्या विरोधात आक्रमक अशी भाषणे करून सरकारने याबाबत तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा लवकरच विराट मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


सदर भीमसैनिकांच्या धरणे आंदोलनाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.  निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारतीय बौद्ध महासभेचे एन.यू. बलांडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे, रिपाइं आठवले पक्षाचे नेते चंद्रकांत चिकटे, वंचित बहुजन आघाडीचे सचिन गायकवाड, भिमशक्तीचे मोहन माने, काँग्रेसेचे यशपाल कांबळे, युवा भिम सेनेचे पंकज काटे, प्रा. अनंत लांडगे, भिम आमचे अक्षय धावारे, युथ पँथर संघटनेचे संतोष वाघमारे, प्रताप कांबळे, ब्लू पँथर संघटनेचे साधू गायकवाड आदींसह विविध पक्ष -संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 लातूर शहर व जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी दलित समाजातील युवक, विद्यार्थ्यांना जातीयद्वेषातून लक्ष्य केले जात असून त्यांच्या अमानुषपणे हत्या करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे.


प्रामुख्याने लातूर शहरातील एमआयडीसी भागातील जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या राजमाता जिजाऊ वसतीगृहात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या बौद्ध समाजातील अरविंद राजाभाऊ खोपे या 13 वषय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे.
चाकूर तालुक्यातील नायगाव येथील कु. सायली सिद्धार्थ गायकवाड हिचा नांदेड रोडवरील एका मुलीच्या वस्तीगृहात बलात्कार करून खून करण्यात आलेला आहे. तसेच औसा तालुक्यातील भूसणी येथील आकाश व्यंकट सातपूते या युवकाचा खून करण्यात आलेला आहे. उदगीर पोलिस ठाणे अंतर्गत देवणी येथे सचिन शिवाजी सूर्यवंशी या युवकाचाही जातीय मानसिकतेतून खून करण्यात आला. या शिवाय शिरूर अनंतपाळ येथील विनोद पंढरी कांबळे व बालाजी शेषेराव कांबळे या दोघांना जबर मारहाण करून अत्याचार करण्याची घटना घडलेली आहे. या सर्व घटनांमधील सर्व आरोपींविरुद्ध खूनाचे व ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून सीआयडी मार्फत चौकशी करावी. तसेच सदर प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आदी प्रमुख मागण्यांचा समावेश सदरच्या निवेदनात करण्यात आलेला आहे. शासन व पोलिस प्रशासनाने मागण्यांबाबत दखल नाही घेतल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.


जबाब दो धरणे आंदोलनाला विविध पक्ष-संघटनांचा मिळाला सक्रिय पाठींबा-
1. भारतीय बौद्ध महासभा 3. अ. भा. काँग्रेस 4. रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया आठवले पक्ष 5. लोकसेवा माथाडी कामगार युनियन
4. रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया आठवले पक्ष 5. भिम टायगर युवा संघटना 6. भिमशक्ती संघटना 7. भिम आम संघटना 8. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 9. रिपब्लिकन सेना 10. सार्वजनिक जयंती उत्सव समिती 11. व्हिजन करिअर अकॅडमी 12. एकता ग्रूप 13. वंचित बहुजन आघाडी 14. विद्रोही ग्रूप 15.मागासवगय सेवानिवृत संघटना 16. यूथ पँथर संघटना 17. युवा भिमसेना 18. ब्लू पँथर 19. लातूर पूर्व भाग नागरी कृती समिती अशा विविध पक्ष,संघटनांनी या धरणे आंदोलनाला सक्रिय पाठींबा दिला होता.
5.

                   जाहिरात 


Post a Comment

Previous Post Next Post