शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी वरवंड. तालुका दौंड. जिल्हा. पुणे. गावच्या हद्दीत बंद खोलीमध्ये 11लाख 2हजार640 रुपये किमतीचा गुटखा जप्त.



यवत पोलिसांची दमदार कामगिरी  वरवंड. तालुका दौंड. जिल्हा. पुणे. गावच्या हद्दीत बंद खोलीमध्ये 11लाख 2हजार640 रुपये किमतीचा गुटखा जप्त.

महाराष्ट्र प्रतिनिधी
 धनंजय काळे

वरवंड ता .दौंड जिल्हा. पुणे गावच्या हद्दीत दि.15/9/2024 रोजी रात्री 1.15 वाजे सुमारास आरोपीचे घरा जवऴ एकुण किमंत 11 लाख 2 हजार 640 रुपये किमतीचा गुटखा यवत पोलिसांनी जप्त करून दमदार कामगिरी बजावली आहे. 

या गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रविंद्र रामदास गोसावी. पोलीस हवालदार नेमणुक यवत पोलीस स्टेशन. यांच्या फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.व कलम--916/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम -123, 223, 274, 275, अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26(2)(i),(ii),(iv),27(3)(ड) प्रमाणे आरोपी रेवणनाथ हरीभाऊ गोसावी रा. वरवंड ता. दौंड जि.पुणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असल्याचे यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.
 तसेच सदर घटनेची यवत पोलीस स्टेशन येथे दि 15/09/2024 रोजी 11.43 वा स्टेशन डायरी मध्ये नोंद 14/202 प्रमाणे नोंद करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 



यवत पोलिसांना घटनास्थळी मिळाला माल एकुण किमंत 11 लाख 2 हजार 640 रुपये किमतीचा गुटखा त्यामध्ये विमल पान मसाला. तंबाखू विमल पान मसाला. केसर युक्त. असा विविध प्रकारचा गुटखा व तंबाखू. आरोपीचे घरा जवळ जप्त करण्यात आले आहे. यातील आरोपी रेवणनाथ हरीभाऊ गोसावी याने आपले घरा समोरील बंद खोलीत. महाराष्ट्र राज्य शासनाची बंदी असलेला गुटखा, पान मसाला ,सुगंधित तंबाखू यांची विक्री करण्याचे हेतूने बेकायदेशीर पणे एकूण 11 लाख 02 हजार 640 रुपये किमतीचा बंदी असलेला गुटख्याचा माल जवळ बाळगला असल्याने त्याचे विरुद्ध. 
भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम -123, 223, 274, 275, अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (i), (ii), (iv), 27 (3) (ड) कलमा अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार - सहा फौज ओमासे सपोनि संपांगे पुढील तपास करीत आहेत.


 सदर कारवाई मा.नारायण देशमुख पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विजय कोल्हे, उत्तम कांबळे, पोलीस हवालदर रविंद्र गोसावी, हिरालाल खोमणे,
  गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक निखील रणदिवे, पोलीस अंमलदर शुभम मुळे, दत्तात्रय टकले, मोहन भानवसे, महिला अंमलदार 
प्रतीक्षा हांडगे, हेमलता भोंगळे,  यांनी कामगिरी बजावली असल्याचे सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post