लोकाधिकार संघ उदगीर तालुकाप्रमुख पदी किशोर चंद्रकांत काळवणे यांची नियुक्ती.
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
प्रतिनिधी रंजित दुपारगुडे
लातूर :- उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील श्री. किशोर चंद्रकांत काळवणे यांची लोकाधिकार संघाच्या उदगीर तालुकाप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
श्री. किशोर चंद्रकांत काळवणे यांची नियुक्ती लोकाधिकारप्रमुख व्यंकटरावजी पनाळे यांनी जाहीर करून लोकाधिकारप्रमुख यांच्या हस्ते काळवणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असल्याचे लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकराव शेळके यांनी माध्यमाना कळविले आहे.
अहमदपूर येथे दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत लोकाधिकारप्रमुख व्यंकटरावजी पनाळे यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले.
किशोर चंद्रकांत काळवणे यांची लोकाधिकार संघाच्या उदगीर तालुकाप्रमुख पदी झालेल्या नियुक्तीचे लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हणमंतराव शेळके, लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके, लोकाधिकार संघाचे मराठवाडा विभाग प्रमुख सुरेंद्रभाई अक्कनगिरे, यांच्यासह लोकाधिकार संघाच्या लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किशोर काळवणे यांचे अभिनंदन केले आहे.


Post a Comment