भरत शेठ शहा व ऍड. राहुल मखरे यांच्या हस्ते मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त
खाऊ चे वाटप
इंदापूर प्रतिनिधी : मोहम्मद पैगंबर जयंती ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने इंदापूर शहरात जुलूस काढण्यात आला. जुलूस मध्ये सामील झालेल्या मुस्लिम बांधवांना. अंजुमन रजा ए मुस्तफा सोशल क्लब. व्यंकटेश नगर इंदापूर. यांच्यावतीने फळे, खाऊ, बिस्कीट, आईस्क्रीम, नॉन केट व बिसलरी चे वाटप
ॲड.राहुल मखरे व भरत शेठ शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून अजिंक्य भैय्या इजगुडे उपस्थित होते. आझाद सय्यद, समद सय्यद, विनोद शिंदे, अल्ताफ मोमीन, साजन ढावरे, अकबर आतार, रहीम मुंडे, हैयुल बागवान, व इतर कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Post a Comment