शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

रामतीर्थ जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप...



रामतीर्थ जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप..

महाराष्ट्र पोलीस न्यूज 24

नायगाव प्ररतिनिधी / रघुनाथ सोनकांबळे

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून रामतीर्थ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सरपंच सौ.मनीषा राजेश तोडे यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रारंभी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून मुक्ती संग्राम दिनानिमित्त रामतीर्थ येथील सरपंच सौ मनीषा राजेश तोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपसरपंच सौ जयश्री मुरलीधर देगलूरे,संतोष पाटील पुयड,संतोष भक्तापुरे,बाबुराव वाघमारे शालेय समिती अध्यक्ष,मारुती योगे उपाध्यक्ष, भारतबाई वाघमारे अंगणवाडी शिक्षिका, मुख्याध्यापक श्री पवळे,शिक्षकवृंद श्रीराम पाटील वजीरगावे,सौ.अरुणा वाघमारे,जयशीला कांबळे, पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले


 यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सहभागी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी गायकवाड उपाध्यक्ष विजय रानडे, सचिव सौ अंजना डांगे कोषादक्ष नवनाथ सूर्यतळ, सदस्य सविता बोयाळ,लक्ष्मी सूर्यवंशी यांची यासह चेअरमन,पोलीस पाटील व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post