शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचे प्रभावी साधन ठरणार ...हर्षवर्धन पाटील



आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचे प्रभावी साधन ठरणार ...हर्षवर्धन पाटील

इंदापूर प्रतिनिधी/अतुल सोनकांबळे

कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत या विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे करण्यात आले महाविद्यालयातील शाहीर अमर शेख सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांचेही मार्गदर्शन लाभले.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे झालेल्या कार्यक्रमात डिजिटल पद्धतीने केले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पारंपरिक कौशल्यावर आधारित व्यवसायांचा विकास करण्याच्या दृष्टीने भारत सरकार प्रयत्न करीत असल्याचे सांगून त्याचाच एक भाग म्हणून अशा व्यवसायांना वित्तीय सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
   सदर कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी डॉ.शिवाजी वीर ,डॉ .भिमाजी भोर ,प्रा.माने यु. एल. प्राध्यापिका मनीषा गायकवाड ,प्रा. निशांत पवार प्रा.दत्तात्रय देवकर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post