मंदिराचे ओट्यावर का बसलास असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ करुन डोक्यात दगड घालुन खून करणाऱ्या बारा आरोपीस जन्म ठेपेची शिक्षा...!
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
नायगाव प्रतिनिधी /रघुनाथ सोनकांबळे
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथिल मा. जिल्हा न्यायधीश १ तथा अति. सत्र न्यायधीश बिलोली श्री. दिनेश ए. कोठलीकर यांनी आरोपी १. निळकंठ जगन्नाथ पाटील, वय ४४ वर्षे, २. सोमनाथ होनयप्पा स्वामी, वय ५३ वर्षे, ३. हणमंत हावगी स्वामी, वय ३० वर्षे, ४. शंकर संगप्पा स्वामी वय ३८ वर्षे, ५. अमृत आनेप्पा बिरादार, वय ५३ वर्षे, ६. शिवाजी रामचंद्र मदने, वय ४४ वर्षे, ७. गणेश नागनाथ हत्ते, वय ३२ वर्षे, ८. शंकर सिद्राम हत्ते, वय ४७ वर्षे, ९. सुरेश माधवराव कवटगे, वय ४८ वर्षे, १०. जगन्नाथ हणमंतराव पाटील, वय ६८ वर्षे, ११. सुभाष संगप्पा हत्ते, वय ५७ वर्षे, १२. सुनिल मलीकार्जुन पाटील, वय ३२ वर्षे, सर्व रा. मौ. कोकलगांव ता. देगलूर जि. नांदेड, यांना कलम ३०२, भा. द. वि. अंतर्गत जन्म ठेपेची शिक्षा व दंड रु ५०००/- प्रत्येकी व दंड न भरल्यास १ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. व कलम १४८ भा. द. वि. अंतर्गत १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु ५०००/- प्रत्येकी व दंड न भरल्यास १ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. व कलम ३ (१) (१०) अॅट्रासिटी अॅक्ट अंतर्गत १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु ५०००/- प्रत्येकी व दंड न भरल्यास १ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रक्कमेतुन मयताच्या वारसाना रु १.५०.०००/- नुकसान भरपाई म्हणून द्यावे, असा आदेश मा. न्यायालयाने दिला आहे.
घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, दि. १९/११/२०१५ रोजी सकाळी ८.०० वाजता च्या सुमारास यातील फिर्यादी नामे चंद्रकांत तुकाराम सुर्यवंशी, वय ४५ वर्षे, जात मांग, रा. कोकलगांव हा गावातील विरभद्र मंदिराचे ओट्यावर बसला असता यातील वरील आरोपीतांनी तेथे येऊन धेडग्या मांगडग्या तु मंदिराच्या ओट्यावर बसतोस काय, तुमची हालकी जात लई माजली म्हणुन जोरजोराने जातीवाचक शिवीगाळ करत आरोपी सुरेश माधवराव कवटगे यांने हातात दगड घेऊन फिर्यादीच्या कपाळावर मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीस मारहाण होत असल्याचे पाहुन फिर्यादीचा भाऊ मयत मारोती तुकाराम सुर्यवंशी व विठ्ठल महादु मदने हे सोडविण्यासाठी आले असता वरील सर्व अरोपीतांनी दगडाने साक्षीदार विठ्ठल महादु मदने यास पण मारहाण केली. मयत मारोती तुकाराम सुर्यवंशी यास दगडाने डोक्यात जबर मारहाण करुन त्याचा खून केला. अशाप्रकारे फिर्यादी चंद्रकांत तुकाराम सुर्यवंशी यांनी त्याच्या भावाचा खून झाल्याचे दिलेल्या तक्रारीवरुन वरील सर्व १२ आरोपी विरुध्द कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, भा.द.वि. आणि सहकलम ३(१) (१०), ३ (२) (५) अॅट्रासिटी अॅक्ट नुसार पो. स्टे. मरखेल येथे गुन्हा दाखल झाला. सदरिल गुन्हयाचा तपास पुर्ण होऊन दोषारोप पत्र मा. अति. सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आले.
सरकातर्फे एकूण ०८ साक्षीदार तपासण्यात आले. व मा. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करुन मा. न्यायधीश साहेबांनी वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.
सरकातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदिप बी. कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात अशोक तानाजी विरकर (पोलीस उपअधिक्षक) यांनी तपास केला. तसेच पैरवी अधिकारी साईनाथ एमेकर (ब. न. २३८१) पो. स्टे. मरखेल यांनी सहकार्य केले.


Post a Comment