शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या विचारांचा वारसा शहा परिवाराने जपला



श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या विचारांचा वारसा शहा परिवाराने जपला

भाऊंच्या पुण्यस्मरणानिमित्त शहा परिवाराने केले अभिवादन 

इंदापूर / प्रतिनिधी अतुल सोनकांबळे 

    माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, श्री. नारायनदास रामदास शैक्षणिक संस्थेचे माजी सचिव मुकुंद शहा व मान्यवरांनी इंदापूर महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. 



   यावेळी भरत शहा यांनी यांनी बोलताना सांगितले की, शहा कुटुंब व श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते. भाऊंनी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, इंदापुर तालूका कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री नारायनदास रामदास शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शेतकरी तसेच लाखो नवयुवकांना दिशा दिली. श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या विचारांचा वारसा आज तागायत शहा परिवाराने जपला आहे. नवीन पिढीने भाऊंचा त्याग, समर्पण आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे.


   यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, माजी संचालक मुकुंद शहा, बापू जामदार, प्रमोद राऊत, अरविंद गारटकर, प्रा. मनोहर बोंद्रे, सुनील तळेकर, पोपट पवार, गणेश महाजन, आर्षाद सय्यद, निवास माने, अशोक चव्हाण, अमोल माने आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post