एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षांच्या भाच्च्यांचा गौण खनिज मुरूम उत्खननात सहभाग : एन पी इंफ्रा कंपनी पुन्हा चर्चेत.
महसूल अधिकारी पंचनामा करुन निघून गेल्यानंतर काही वेळातच पुन्हा सदर ठिकाणी मुरूम उत्खनन जोमाने सुरू
(इंदापूर):- शेटफळ हवेली तलावातून एन. पी. इन्फ्रा.कंपनीकडून नियमबाह्य मुरूम उत्खनन केले जात होते, हे नियमबाह्य उत्खनन आखेर बंद करण्यात आले आहे.
हे उत्खनन बंद झाल्यानंतर सदर कंपनीने बावडा (मानेमळा) या भागांमध्ये मुरूम उत्खनन चालू केले आहे, परंतु सदर मुरूम उत्खनन करताना सदरील जागेचा उत्खनन करण्याचा परवाना घेतला आहे का ?
उत्खनन करण्यात येणाऱ्या जागेचा महसूल विभागाकडे महसूल भरण्यात आला आहे का ?
ज्या रोडने मुरूम वाहतूक चालू आहे सदर रोड चा वाहतूक परवाना घेण्यात आला आहे का ?
सदर ठिकाणी उत्खनन सुरू आहे याबाबतची माहिती मंडळ अधिकारी व तलाठी यांना देण्यात आली आहे का ?
सदर ठिकाणी उत्खनन चालू आहे अशी माहिती मंडल अधिकारी व तलाठी यांना देण्यात आल्यानंतर सदर जागेवर ती तलाठी यांनी येऊन उत्खनन केलेल्या जागेची मोजमापे करून पंचनामा केला आले का ?
सदर कंपनीने बावडा (मानेमळा) या भागांमध्ये मुरूम उत्खनन चालू केले आहे, परंतु सदर मुरूम उत्खनन पंचनामा चालू असताना सदर जागेतील उत्खनन बंद करण्यात आले होते. व यानंतर हे उत्खनन एन पी इंफ्रा कंपनीने बंद ठेवावे असे महसूल अधिकाऱ्यांनी सदर कंपनीस सांगितले होते. परंतु सदर ठिकाणाहून महसूल अधिकारी निघून गेल्यानंतर काही वेळातच पुन्हा सदर ठिकाणी मुरूम उत्खनन जोमाने सुरू करण्यात आले. या उत्खननाबाबत महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिल्या असता त्यांनी या प्रकाराबाबत आम्ही पंचनामा केला आहे हा पंचनामा आम्ही तहसीलदार यांच्याकडे उद्या सादर करणार आहोत.
तरी नंतर उत्खनन चालू असल्याबाबतची माहिती देण्यासाठी आपण वरिष्ठांशी संपर्क साधावा असे सांगितलें. यानंतर महसूल विभागातील वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपले जे काय म्हणणे असेल ते आपण लेखी स्वरूपात मांडावे असे त्यांनी म्हटले आहे.



Post a Comment