शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नांव्ही,डोंबाळवाडी, रुई परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन




नांव्ही,डों बालवाडी, रुई परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन

एन.पी. इन्फ्रा कंपनीच्या कामावरती चालणाऱ्या हायवा गाड्यांचे नंबर गायब...

 प्रतिनिधी:  अतुल सोनकांबळे इंदापुर

इंदापूर तालुक्यातील न्हावी, रुई , डोंबाळवाडी परिसरात बेकायदेशीर मुरूम वाहतूक
करणाऱ्यां वाहानावरती  कारवाई होणार का ?

इंदापुर  तालूक्यातील नाव्ही, रुई , डोंबाळवाडी परिसरातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर  व नियमबाह्य 
मुरूम वाहतूक सुरू असून या
बेकायदेशीर  नियमबाह्य  मुरूम वाहतूक करणाऱ्यांवर
कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होतआहे.
न्हावी , रुई आणि डोंबाळवाडी परिसरातून पोकलॅण्ड व जे.सी.बी.च्या
साह्याने दिवसा उत्खनन करून मोठ्या स्वरुपात
मुरमाची चोरी करण्यात येत असून अवजड
वाहनांच्या साह्याने बेकायदेशीरपणे मुरूम वाहतुक
चालू आहे.


आनेक हायवा गाड्यांवरती नंबरच नाहीत  व असेल तर नंबर चुकीचा टाकला जातो किंवा तो खोडलेला आसतो 

कोट्यावधी रुपयाचे गौण खनिज मुरूम उत्खनन करून या परिसरातून वाहतूक केले जाते खऱ्या अर्थाने महसूल विभाग या गाड्यांवरती कारवाई करणारच नाही यात नवल वाटायला नको 
कारण या अधिकाऱ्यांचे व मुरूम उपसा करणाऱ्या ठेकेदाराचे लागेबांधे असल्याचे नागरिक बोलत आहेत.
 बंडगर नावाच्या  ठेकेदारास एन.पी.इंफ्रा कंपनीने पुढे केले आहे.  या कामावरती चालणाऱ्या गाड्या सर्रासपणे बिगर नंबर प्लेटच्या असतात या सर्व गाड्यांवरती अतुल खूपसे असे नावे लिहिली असून एकाही गाडीवरती नंबर प्लेट नाही .  किंवा ती असेल तर नंबर चुकीचा टाकला जातो किंवा तो खोडलेला आसतो 



कोट्यावधी रुपयाचे गौण खनिज मुरूम उत्खनन करून या परिसरातून वाहतूक केले जाते खऱ्या अर्थाने महसूल विभाग या गाड्यांवरती कारवाई करणारच नाही यात नवल वाटायला नको कारण या अधिकाऱ्यांचे व मुरूम उपसा करणाऱ्या ठेकेदाराचे लागेबांधे असल्याचे नागरिक बोलत आहेत.

चौखट

तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या वरती झालेल्या हल्ल्यातील गुन्हेगार बंडगर यांच्या संपर्कातील

इंदापूर तालुक्यातील व्हावी, रुई ,डोंबाळवाडी परिसरातून अवैध्य मुरूम उत्खनन करणारे व वाहतूक करणारे बंडगर नामक ठेकेदार यांच्या सर्व गाड्या या अवैद्य मार्गाने चालणाऱ्या मुरूम व वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जातात मागील काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला होता त्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सोडला तर सर्व आरोपी हे बंडगर यांच्या संपर्कातील आहेत

Post a Comment

Previous Post Next Post