धक्कादायक ब्रेकिंग न्यूज इंदापूर शहरातील नामांकित आय कॉलेजच्या समोर युवकावर अज्ञाताकडून गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बारामतीमध्ये एका महाविद्यालयीन युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर सायंकाळी इंदापूर शहरात जुना पुणे सोलापूर महामार्गावरील महाविद्यालयासमोर युवकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव राहुल चव्हाण रा.सिरसोडी असे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे
पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून जखमी युवकास उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. हल्लेखोर पळून गेले आहेत. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत

Post a Comment