प्रतिनिधी :- रणजित दुपारगुडे
सोलापूर:= (2 / 10 / 20 )सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, दक्षिण सोलापूर या कार्यालयातील सेवानिवृत्त शिपाई कर्मचारी राहुल तुकाराम सुतकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत.सेवानिवृत्त झाल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखांने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे उपदान विहित कालमर्यादित देणे कार्यालय प्रमुखांवर बंधनकारक असताना सुतकर यांना सेवा निवृत्तीनंतरचा मिळणारा आर्थिक लाभ वेळेत न देता तो उशिराने अदा केल्याने राहुल सुतकर हा सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या प्रलंबित असलेल्या आर्थिक लाभासाठी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था दक्षिण सोलापूर या कार्यालयासमोर आज दि.02 ऑक्टोबर 2024 पासुन महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
या उपोषणास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचे युवा तडफदार नेतृत्व विजयकुमार भांगे सर, धडाकेबाज नेते राजाभाऊ सोनकांबळे, ज्येष्ठ नेते सी.एस.स्वामी, सटवाजी होटकर व अनुभवी ज्येष्ठ नेते रघुनाथ बनसोडे, व ज्येष्ठ नेते चंद्रकांत चलवादी आदींनी उपोषण स्थळी जाऊन भेट दिली. व या उपोषणामध्ये सहभाग घेत राहुल सुतकर यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला.
यानंतर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त सरचिटणीस एक अभ्यासु नेतृत्व असलेले सुधीर चंदनशिवे यांनीही कार्यकर्त्यांसमवेत राहुल सुतकर यांच्या उपोषणास पाठींबा देत उपोषणाला बसले.याची सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था दक्षिण सोलापूर या कार्यालयातील कांही अधिकारी/कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालय प्रमुखांच्या सूचनेनुसार राहुल सुतकर यांच्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चर्चा करून येत्या आठ दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे.लेखी पत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आज दुपारी दिले आहे.त्यामुळे राहुल तुकाराम सुतकर यांनी सर्व अनेक कामगार संघटनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी 2-30 वाजता सरबत घेऊन उपोषण तात्पुरते स्थगित केले.यावेळी विविध कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.!
Post a Comment