प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यामध्ये संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन च्या माध्यमातून आदरणीय सुरेश जी मोहिते साहेब (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) यांच्या अधिपत्याखाली अठरापगड जातींना एकत्रित करून पुणे जिल्ह्याची कमिटी जाहीर करण्यात आली.
व कमिटी जाहीर केल्यास तातडीने शिक्रापूर या ठिकाणी जावेद भाई मोमीन (पुणे जिल्हा निरीक्षक) यांनी वंचित बहुजन माथाडीचे संपूर्ण कार्यकारणी बैठक घेण्यात आली, अमित भाऊ गडदे (पुणे जिल्हा अध्यक्ष) यांनी पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांचे न्याय हक्क त्यांना मिळत नाही , कामगारांची पिळवणूक होत आहे अशा तक्रारी आले असून कामगारांच्या प्रश्नावर महत्त्वाचे मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन माथाडी च्या माध्यमातून ही बैठक पार पडली व जास्त प्रमाणात तालुका बांधणी करून "गाव तिथे शाखा" असे मोहीम राबवण्याचा विषय या बैठकीत अंमलबजावणी करण्यात आला आहे.
या बैठकीत उपस्थित असलेले मा.जावेद भाई मोमीन(पुणे जिल्हा निरीक्षक),अमित भाऊ गडदे (पुणे जिल्हा अध्यक्ष), विशाल भाऊ गडगे (पुणे जिल्हा महासचिव), मारुती खरात पाटील (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), नफिस भाई शेख (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), गजानन भाऊ इंगळे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), गजानन भाऊ आहेरकर (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), विनोद भाऊ शिंदे (पुणे जिल्हा सचिव), धीरज भाऊ कांबळे (पुणे जिल्हा सचिव),गौतम भाऊ कदम (पुणे जिल्हा सहसचिव), स्वप्निल भाऊ बगाटे (पुणे जिल्हा सहसचिव),बाळू मारुती भालेराव (पुणे जिल्हा सहसचिव), पंकज भाऊराव सरोदे, (पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख/आंबेगाव तालुका अध्यक्ष),मयूर भाऊ गुळवे (पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, बबनराव खेसे पुणे जिल्हा संघटक), मनोहर भाऊ भालेराव (पुणे जिल्हा संघटक), संतोष भाऊ सरोदे (पुणे जिल्हा संघटक), विकास सुरवसे (पुणे जिल्हा सह-संघटक), रघुनाथ लोहकरे (पुणे जिल्हा सह-संघटक), दशरथ भाऊ पंचरास (शिरूर तालुका अध्यक्ष), उद्धव भाऊ जाधव (शिरूर तालुका उपाध्यक्ष), दिलीप भाऊ लोंढे (शिरूर तालुका सचिव), रमेश भाऊ गजेंद्र (शिरूर तालुका उपसचिव),कांचन विनोद काचके, विनोद वाघमारे, लिंबाजी घुगे, मनोर भालेराव, दीपक शिंदे, अशोक भालेराव.
Post a Comment