शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राहुल सुतकर यांच्या उपोषणा सुधीर चंदनशिवे व राजाभाऊ सोनकांबळे यांच्या मध्यस्थीमुळे यश...

.              रणजित दुपारगुडे
                 प्रतिनिधी 
         सोलापूर:- सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, दक्षिण सोलापूर या  कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी राहुल तुकाराम सुतकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखांने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे उपदान विहित कालमर्यादित देणे कार्यालय प्रमुखांवर बंधनकारक असताना सुतकर यांना सेवानिवृत्तीनंतरचा मिळणारा आर्थिक लाभ वेळेत न देता तो उशिराने अदा केल्याने राहुल सुतकर हे त्यांच्या प्रलंबित असलेल्या आर्थिक लाभाच्या मागणीसाठी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था दक्षिण सोलापूर या कार्यालयासमोर बुधवार दि. 02 ऑक्टोबर 2024 पासुन महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त आमरण उपोषणाला बसलेले होते.       
          
        या उपोषणास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचे युवा तडफदार नेतृत्व विजयकुमार भांगे सर, धडाकेबाज नेते राजाभाऊ सोनकांबळे, ज्येष्ठ नेते सी.एस.स्वामी, सटवाजी होटकर व अनुभवी ज्येष्ठ नेते रघुनाथ बनसोडे, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते शंतनु गायकवाड, चंद्रकांत चलवादी, विठ्ठल मोरे, राजकुमार बनसोडे, अशोक सोनकांबळे, गंगाधर सरवदे, यलदास वामने आदींनी उपोषण स्थळी जाऊन भेट दिली. व या उपोषणामध्ये  सहभाग घेत राहुल सुतकर यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला होता.
            
          या उपोषणा संदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त सरचिटणीस एक अभ्यासु नेतृत्व असलेले सुधीर चंदनशिवे यांनी निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक श्री.अमर झाल्टे साहेब, सोलापुरचे उपनिबंधक श्री. किरण गायकवाड साहेब, पुणे विभागाचे जाॅंईंट रजिस्टार श्री.योगीराज सुर्वे साहेब आदी प्रमुख वरिष्ठ अधिकार्‍यांशी बर्‍याचदा मोबाईल द्वारे सविस्तर सुतकर यांच्या मागणीबाबत चर्चा करून यशस्वी मध्यस्ती करून योग्य तोडगा काढुन सदरचे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगीत केले.राहुल सुतकर यांच्या मागणीबाबत पुणे व सोलापूर या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार राहुल सुतकर यांच्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चर्चा करून येत्या आठ दिवसात सकारात्मक विचार करून योग्य असा निर्णय घेण्यात येईल असे. लेखी हमी पत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दुपारी दिले आहे.
        त्यामुळे राहुल तुकाराम सुतकर यांनी अनेक विविध कामगार संघटनेच्या प्रमुख नेत्यांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काल दुपारी 2-30 वाजता सरबत घेऊन उपोषण तात्पुरते स्थगित केलेले आहे . यावेळी विविध कर्मचारी संघटनेचे नेते सुधीर चंदनशिवे, विजयकुमार भांगे, राजाभाऊ सोनकांबळे व अमृतराव कोकाटे, शंतनु गायकवाड तसेच माजी सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब सरवदे या प्रमुख पदाधिकार्‍यासह  सहाय्यक  निबंधक, सहकारी संस्था दक्षिण सोलापूर कार्यालयातील अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते*.

Post a Comment

Previous Post Next Post