मौजे सारखनी येथील अवैध्य मटण मार्केट ला प्रशासकीय अधिकारी यांचा पाठिंबा आहें का?
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
किनवट तालुका
प्रातीनिधी : गजानन पवार
किनवट : तालुक्यातील सारखनी बाजार पेठेस अनैक खेडे गावातील नागरिक खरेदी -विक्री करिता सारखनी बाजारपेठेस पहिले प्राधान्य देतात
मौजे सारखनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शेत शिवारास गावाशी जोडणाऱ्या मुख मार्गावर अवैध्य मटण मार्केट स्थापन करून
नागरिकांच्या आरोग्यास धोका दायक असणारे मास
काही व्यापाऱ्यांन कडून विक्री केले जात आहें
सदरील व्यापाऱ्यांनी मास विक्रीची दुकाने मुख्य मार्गावर लावली असल्याने शेतात ये जा करणाऱ्या महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहें
यासह वाहतूक कोंडीला देखील नागरिकांना सतत सामोरे जावे लागत आहें
सदरील मटण मार्केट मधील मास विक्रेत्या कडून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणारे मास मोठ्या प्रमाणात विक्री केले जात असल्याचे आढळून आले आहें
मटण विक्रेत्यां कडून कोणत्याही प्रशासकीय नियमांचे पालन केले जात नसून
मास विक्रेत्यांकडून नागरिकांना होत असलेल्या असुविधेची
प्रशासकीय कर्मचारी यांच्या कडून दखल घेतली जात नसल्याने
मास विक्रेत्यांच्या अवैध्य कामास प्रशासकीय कर्मचारी यांचा पाठिंबा आहें का असा सवाल देखील नागरिकांनी व्यक्त केला आहें
सदरील मटण विक्रेते प्रशाकीय नियमांचे उल्लंघन करून आरोग्यास धोकादायक असेलेले मास विक्री करतात
आणि यांच्या कडे कोणीही लक्ष देत नसल्याने
नागरिकांनी मुख्यमंत्री यांना सदरील घटनेशी अवगत करण्याचे ठरवले आहें
सदरील विषयावर मुख्यमंत्री साहेबाना निवेदन देण्यात येईल अशी चर्चा देखील नागरिकांन कडून ऐकण्यात आली आहे



Post a Comment