नायगाव शहरात ईद-ए-मिलाद उन नबी उत्साहात साजरा...
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे....
नायगाव शहरात आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद ऊन नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सण शहरातील व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या सणाला मिलाद किंवा बराफत असेही मानतात. 12 रबी उल अवल या तारखेला हा सण मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे.
ईद मिलाद उन नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या शिकवणीला समर्पित आहे. हजरत मोहम्मद हे इस्लामचे शेवटचे पैगंबर मानले जातात. हा सण पूर्ण देशात दिनांक 16 सप्टेंबर रोजी साजरा झाला. पण नायगाव सह बऱ्याच ठिकाणी श्री गणेश उत्सव असल्यामुळे येथील मुस्लिम बांधवांनी हा सण दिनांक 16 सप्टेंबर ऐवजी 22 सप्टेंबरला साजरा करण्याचे ठरवले होते
त्यानुसार आज हा सन 22 सप्टेंबर रोजी नायगाव शहरात मोठ्या उत्साहात व शांततेत शहरातील प्रमुख रस्त्यावरून एक भव्य रॅलीचे आयोजन करून हा सण साजरा करण्यात आला. रॅलीत पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम शेठ, करीम चायुस, जुनेद पठाण, सय्यद भाई मुल्ला, हाजी तौफिक बागवान, ईसाभाई ,मुजाहिद सिद्दिकी ,मुहीब शेठ कच्ची, आयुब फकीर साहब, सय्यद सिकंदर, नयुम भैसेकर, माजिद हळदेकर, आसिफ सरदार, अंजार बिलोलीकर, अबू बकर मुस्तझर, आदम रहीम तुला, बाबू जीलानी, बबलू चांद साब, जाफर जलाल, यांच्यासह हजारो मुस्लिम बांधव या उत्साहात उपस्थित झाले होते ,
तर या सणाला कुठलाही गालबोट लागू नये म्हणून नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता.




Post a Comment