संकेत बागरेचा
धुळे जिल्हा प्रतिनिधी
धुळे : शिंखेडा तालुक्यातील ब्राम्हणे शिवारातील शेतामधून जानेवारी महिन्यात चोरट्याने इलेक्ट्रीक मोटार लंपास केल होती. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर समांतर तपासात धुळे स्थानिक गुन्हे शाखेने घटनेतील चोरट्यांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून ६८ हजार रूपये किंमतीच्या पाच इलेक्ट्रीक मोटारी जप्त केल्या आहेत.
दि.३१ जानेवारी रोजी प्रिदर्शन काशिनाथ बागले, रा.ब्राम्हणे, ता. शिंदखेडा यांचे मालकीची इलेक्ट्रीक मोटार ब्राम्हणे शिवारातील त्यांच्य शेतामधून चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी श्री. बागले यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार चोरट्यावर भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर
गुन्ह्याचा समांतर तपास सुरू सतांना दि.२० ऑक्टोबर रोजी धुळे एलसीबीचे पोनि श्रीराम पवार यांना सदरचा गुन्हा हा राज भावडु कोळी (२०) व राहुल संजय मिल (२०) दोघे रा.रामी, ता. शिंदखेडा यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोनी श्रीराम पवार यांनी पथकास कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली तर दिली.
यासह ६८ हजार रूपये किंमतीच्या प पाच इलेक्ट्रीक मोटारी काढून दिल्या. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक व गुन्हे शाखेचे पोनि श्रीराम पवार, पोसई अमित माळी, असई संजय पाटील, पोहेकॉ सचिन गोमसाळे, दिनेश परदेशी, चेतन बोरसे, पोकॉ विनायक खैरनार, हर्षल चौधरी या पथकाने केली.
Post a Comment