शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मुंबई शहरातून जुन्नर मध्ये असलेला लेणी समुह पाहण्यासाठी आलेल्या अभ्यासक यांचा सन्मान करण्यात आला..


पंकज सरोदे 
   पुणे जिल्हा प्रतिनिधी 
          आज दिनांक 20/10/2024 रोजी अशोका वाॅरियर्स लेणी अभ्यासक संघ हा जुन्नर तालुक्यातील मानमुकड डोंगरमधील असलेली लेणी समुह चा अभ्यास करण्यासाठी आली होती . यावेळी लेणी अभ्यासक शिद्धार्थ कसबे  यांनी पुर्ण लेणीची माहिती दिली
अंबा अंबिका लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे.इ.स.पू पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत.यात.बौध्द विहार.चैत्यगृह .शिलालेख पाण्याची  कुंडे यासारखी 33खोदकामे दिसुन येतात 
          अशोका वाॅरियर चे अनिल जाधव  व संघ यांना लेणी समुह चाफोटो आसलेली फ्रेम देऊन प्रबुध्दभारत फाऊंडेशन लेणी ने सन्मान केला.यावेळी पुरातत्व विभाग यांनी केलेलं काम व प्रबुध्दभारत फाऊंडेशन लेणी सर्वधक जुन्नर यांनी या लेणीवर सुरू केलेली चळवळीची माहीती आयु.अनिल जाधव सर यांनी त्यांच्या संघाला दिली लेणीवर झालेला बदल पाहुन सर्वजन खुश झाले.
यावेळी प्रबुध्दभारत फाऊंडेशन लेणी सर्वधक समितीचे .गणेश वाव्हळ. ऊमेश वाघबरे. मंगेश वाघमारे. प्रज्वल भालेराव.रोहन वाव्हळ उपस्थिती होते

Post a Comment

Previous Post Next Post