शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कपाशीच्या आड गांजाची लागवड शेतकऱ्यावर गुन्हा, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

   
      संकेत बागरेचा 
            धुळे जिल्हा प्रतिनिधी 
         धुळे : तालुक्यातील आंबोडे गाव शिवारातील एका शेतात गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १ लाख ५५ हजार ८०० रूपये किंमतीचा गांजा पथकाने जप्त केला आहे.
   आंबोडे शिवारात धनराज तुळशीराम पारखे (४०), रा.आंबोडे, ता.जि. धुळे या शेतकऱ्याने कपाशी पिकाच्या आड गांजाची लागवड केली असल्याची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोनि अभिषेक पाटील यांना मिळाली.
      त्या अनुषंगाने पोनि अभिषेक पाटील यांनी सदरची बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणीत पथकास कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने दि.१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.४० वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील आंबोडे शिवारातील शेत गट क्र.१३/२ या ठिकाणी पहाणी केली. या पहाणीत कपाशी पिकाच्या आड गांजाची लागवड केलेली असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत १ लाख ५५ हजार ८०० रूपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी धनराज तुळशीराम
     
      पारखे (४०), रा. आंबोडे, ता.जि.धुळे याचे विरूध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोसई अनिल महाजन करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एसडीपीओ संजय बांबळे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोनि अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोसई अनिल महाजन, पोहेकॉ राकेश मोरे, योगेश पाटील, श्री. कांबळे, पोना संदीप शिंदे, प्रमोद पाटील या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post