शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

घरगुती गॅस सिलेंडरातून गॅस रिफीलींग करणाऱ्यांवर छापा


संकेत बागरेचा 
धुळे  जिल्हा प्रतिनिधी 
         धुळे :  मुजाहीद अब्दुल रशीद, य २६, रा.ग.नं.६, ताशा गल्ली, धुळे यांचे ताब्यातून एकुण ६०.४०० रु.
एलसीबीची कारवाई
धुळे - शहरात घरगुती गॅस सिलेंडरातून बेकादेशिर रित्या वाहनात इंधनाणात गॅस भरण्यावर कारवाई केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक  श्रीकांत धिवरे यांन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्क श्रीराम पवार यांनी कारवाईचे आदेश दिले होते. 
        सदर कारवाई अधिकारी व अमलदार यांनी विशेष पथके तयार करुन छापा टाकला. आरोपी किंमतीचे १२ गॅस सिलेंडर व गॅस भरण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. आरोपीविरुध्द चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे लिक्कीफाईड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन ऑर्डर सन २००० चे कलम १(३) चे उल्लंघन व जि.व.का.क.३/७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 
         
    सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर कळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोउनि. अमित माळ, पोउनि. प्रकाश पाटील, पोहेकॉ. मच्छिद्र पाटील, पोहेकॉ. सदेसिंग चव्हाण, पोहेकॉ. प्रशांत चौधरी, पोहेकॉ. प्रकाश सोनार, पोहेकॉ. चेतन बोरसे, पोहेकॉ. सचिन गोमसाळे, पोहेकॉ. तुषार सुर्यवंशी, पोकॉ. राहुल गिरी, पोकॉ. कमलेश सुर्यवंशी, पोकॉ. हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post