धुळे जिल्हा प्रतिनिधी
धुळे : राज्य उत्पादन शुल्क, धुळे विभागाची, विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ आचारसंहिता कालावधीत धुळे जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच हातभट्टी निर्मिती, विक्री केंद्रावर धडक कारवाई आणि आंतर राज्यीय सीमेवर चेक पोस्ट उभारून वाहनांची कसून तपासणी सुरु, एकूण ७६ गुन्हे नोंद करणेत आले. रु. ९३,०२,९७८/- किमंतीचा मुद्देमाल जप्त श्री डॉ. विजय सूर्यवंशी सो. मा.आयुक्त, रा.ऊ.शु म.रा. मुंबई, श्री प्रसाद सुर्वे, मा. संचालक (अं.व द) रा.ऊ.शु - म.रा. मुंबई, श्रीमती उषा वर्मा मॅडम, विभागीय उपायुक्त नाशिक विभाग, नाशिक तसेच श्रीमती स्वाती काकडे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली विधान सभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने धुळे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क, विभागाची धडक कारवाई सुरु आहे.
आचारसंहिता कालावधी दि.१५/१०/२०२४ सुरु झालेपासून आजपर्यंत अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच हातभट्टी निर्मिती, विक्री केंद्रावर कारवाई करून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये एकूण ७६ गुन्हे नोंद करून ५८ आरोपोंना अटक करण्यात आली. कारवाईमध्ये विविध प्रकारचे एकूण २९९७७.८७
गुजरात व मध्य प्रदेश सीमावर्ती
भागात चेक पोस्ट उभारून घेतली मद्य, ०५ वाहने असा एकूण रु. ९३,०२,९७८/- किमंतीचा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक धुळे यांचे पथकाकडून संपूर्ण जिल्ह्यात कारवाई करून, एकूण ३० गुन्हे नोंद करून, १६ आरोपीना अटक करण्यात आली आहे. ०२ वाहनासह एकूण रु.३३,१४,०३८/- किमंतीचा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाकडून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनाची कसून तपासणी करणेत येत आहे.
सदरची कारवाई श्री.डी. एल. दिंडकर निरीक्षक, रा.ऊ. शु भरारी पथक धुळे, श्री आर. आर. धनवटे निरीक्षक रा.ऊ.शु धुळे विभाग, श्री. देविदास नेहूल निरीक्षक रा.उ.शु. शिरपूर विभाग, श्री अंकुश मते निरीक्षक रा.उ.शु. सीमा तपासणी नाका हाडाखेड यांचे अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे. तरी जनतेस आवाहन करण्यात येते कि अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतूक संबंधी कोणतेही माहिती अथवा तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्रि क्रमांक १८००२३३९९९९ व थक ढड-डाझ नं ८४२२००११३३ यां क्रमानाकावर संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल.
Post a Comment