धुळे जिल्हा प्रतिनिधी
महू येथून धुळ्याच्या दिशेने होत असलेली गुटख्याची तस्करी सोनगीर पोलिसांनी रोखली. कंटेनरसह ३१ लाख ९० हजार ८६० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित पानमसाला व गुटख्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने महु (उत्तरप्रदेश) येथून धुळ्याक डे एमएच-४६-एआर- ६४३१ क्रमांकाच्या कंटेनरमधून वाहतूक होत असल्याची माहिती काल दि.६ नोव्हेंबर रोजी सोनगीर पोलीसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सोनगीर तेल नाक्याच्या पुढे सापळा लावला असता टोल नाक्याच्या पुढे कंटेनरला पकडण्यात आले. तपासणी केली असता त्यात १० लाख ५६ हजार रूपये किंमतीचा पुकार मिश्रीत पानमसाला, १ लाख ५१ हजार २०० रूपये किंमतीची सुगंधीत तंबाखू, २ लाख ८७ हजारांची युआरपी चेवींग टोबेंका, १ लाख ९६ हजार ५६० रूपयांची वनारसी आशिक सुगंधीत सुपारी भरलेल्या लहान मोठ्या गोण्या आढळून आल्या. या कारवाईत एकुण १६ लाख ९० हजार ८६० रुपये किमंतीचा पानमसाला (गुटखा) व १५ लाखांचे कंटेनर असा एकुण ३१ लाख ९० हजार ८६० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक मोहम्मद सदाम साहेब जान (रा. मलिकशापुर पो. कोटीला ता. जि. आझमगढ़, उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध सोनगीर पोलीस ताण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, पोसई रविद्र महाले, पोकों नितीन जाधव, पोका विजयसिंग पाटील, वैपक पार्टील, रोहन वाघ यांच्या पथकाने केली.
Post a Comment