शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कोल्हापुर जिल्ह्यात अवैध व्यवसायावर कठोर कारवाई : पोलीस अधिक्षक यांच्या सुचनेनुसार : कळे पोलीस ठाणे

      
     रणजित दुपारगुडे 
                     प्रतिनिधी 
       कोल्हापुर  :   दि .४/११/२०२४ रोजी ठिक ८.०० च्या सुमारास बाजार भोगाव ते कळे रोडवर चार चाकी छोटा हत्ती या गाडी तून बेकायदेशीर देशी विनापरवाना दारु ची वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली असता कळे पोलीस ठाण्यातील पोलीस अमंलदार सुनील खाडे व शहाजी दुर्गुळे यांना माहिती मिळाली असता.
             दि.४/११/२०२४ रोजी रात्री ठिक ८.०० वाजता  बाजारभोगाव ते कळे जाण्याऱ्या रोडवर काटेभोगाव ता. पन्हाळा गावच्या हद्दीत तळेवाडी फाटया जवळ महादेव मंदिर शेजारी सापळा लाऊन बेकायदेशीर,  विनापरवाना , विदेशी दारुची वाहतुक करत असताना  रघुनाथ सदाशिव आवळे कोयना कॉलनी गांधीनगर ता . करवीर जि . कोल्हापूर या इसमास रात्री ८.३० वाजता ताब्यात घेण्यात आले.
        त्यांचा ताब्यातील चार चाकी छोटा हत्ती गाडी नंबर एम.एच.०९ जी जे २४२१ मधील कागदी पुठयांच्या खोक्या मधील वेगवेगळ्या कंपनीची विदेशी दारु २ ,९७,५२० रु किमतीची व गुण्यात वापरलेली छोटा हत्ती टेम्पो अंदाजे किमंत ४,००,००० असा एकूण ६,९७,५२० रु . किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी महेंद्र पंडीत,  श्रीमती जयश्री देसाई , पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्दर्शनाखाली कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील, फौजदार  महादेव खाडे, सुनील खाडे , शहाजी दुर्गुळे , सचिन चव्हाण, विक्रम पाटील या सर्वांनी सहकार्य केले . विधान सभा निवडणूक  आचारसंहीताच्या या वातावरणात   महाराष्ट्र पोलीस न्यूज २४  च्या चॅनल च्या माध्यमातून ही बातमी प्रकाशित करण्यात आली. यामुळे या भागातील  गुन्हेगार अपराध्यांना चांगला चोप मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post