शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 45 पानटपरी वरती 9000 रूपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली....

 दि.10/12/2024 रोजी.. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय सातारा...
सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल
        मा. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब, मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन मॅडम, सिव्हिल सर्जन डॉ.युवराज करपे सर, अँड, सिव्हिल सर्जन डॉ. राहूलदेव खाडे सर,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष चव्हाण सर, जिल्हा सल्लागार डॉ.दिव्या परदेशी मॅडम यांच्या मार्गदर्शनातून आज फलटण सिटी व ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व परिसरात तंबाखू नियंत्रण कायदा अंमलबजावणी करण्यात आली...
          सायकॉलॉजीस्ट दिपाली जगताप आणि सोशल वर्कर ईला ओतारी यांनी तसेच दोन्ही पोलीस स्टेशन चे स्टाफ यांच्या सहकार्यातून एकूण 45 पानटपरी वरती 9000 रूपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली....
     यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशन चे इन्चार्ज पी.आय. शहा साहेब आणि ग्रामीण पोलीस स्टेशन चे पी.आय.महाडिक साहेब यांचे खूप खूप सहकार्य मिळाले त्याबद्दल जिल्हा रुग्णालय कडून त्यांचे धन्यवाद मानते..

Post a Comment

Previous Post Next Post