निलंबन-- पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांच्यावर कारवाई पोदार शाळेतील शिक्षक हैदर अली शेख याला बलात्काराच्या गुन्ह्यात मदत करणे भोवले,
उपसंपादक -रमेश मामा गणगे
धाराशिव येथील पिंक पथकाची पोलीस उपनिरीक्षक क गणेश जांभळे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे पोदार स्कूल मधील शिक्षक हैदर अली शेख यांच्यावर सहशिक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद केला होता त्या गुन्ह्यात तपासात अली याला मदत केल्याचा ठपका ठेवत जावळे यांचे निलंबन केले आहे हैदर अली शेख याला अटक केल्यावर पोलीस कोणतीही मागणी अपेक्षित असताना जांभळे यांनी रिमांड मध्ये न्यायालयीन कोठडी मागितली जप्ती पंचनामा करताना व्हिडिओग्राफी करणे बंधनकारक असताना तो न करणे गुन्ह्याशी संबंधित पीडिता व आरोपी कार्यरत असलेल्या शाळेतील लॉजवरील साक्षीदार यांचे जवाब न घेणे गुन्हा नोंद झाल्यावर 24 तासात घटनास्थळ पंचनामा न करणे यासह अन्य ठपका ठेवला आहे, अली हा सध्या धाराशीतील जेलमध्ये आहे
पोदार स्कूल मधील सीनियर कोओर्डिनेटर असलेल्या शिक्षक हैदर अली शेख यांनी सहशिक्षकेला विविध आम्हीच दाखवून सोलापूर व धाराशिव येथे लॉजवर नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे , हा शिक्षक पिडीत शिक्षकेसह तू चांगले शिकवतेस माझ्या ओळखी आहेत तुझे प्रमोशन करून एअर लीडर करतो असे सांगत आमिष दाखवायचा व तिच्यावर बळजबरीने बलात्कार करायचा असे फिर्यादीत नमूद आहे हैदर अली शेख यांच्या वर्तनाबाबत अनेक तक्रारी आहेत,
जांभळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी त्यांचे निलंबन केले धाराशिव येथील पोस्कोच्या गुन्ह्यातआरोपी बाळू अशोक काळे व आनंदनगर येथील पोस्को गुन्ह्यात आरोपी आंबेवाडी येथील ओम गुणवंत कदम याला अटक न केल्याने आरोपीच्या अटकपूर्व जामीन झाला त्यावर वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली नाही , पोस्को गुन्हा दाखल होऊन आरोपी सौरभ चंद्रकांत भिंगाडे याला अटक न करणे अशा प्रकरणात ठपका ठेवला आहे
आरोपींना जामीन मिळण्यासाठी मदत करणे महिला व बाल विषयी पुण्यात असंवेदनशील दृष्टिकोन ठेवणे, तपासात उणीवा निष्काळजीपणा ठेवून आरोपीला मदत करणे असा प्रकार गंभीर असून त्यामुळे जांभळे यांचे निलंबन करण्यात आले आहे निलंबन काळात त्यांना मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे संलग्र करण्यात आले आहे
पोदर स्कूलच्या पालकांनी स्कूलच्या प्रशासनाकडे लिखित तक्रार दिली होती त्यात अनेक बाबी नमूद होत्या त्यावर कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा 7 7 डिसेंबर रोजी लिखित तक्रार दिली आहे शिक्षक हैदर अली यांच्या विरोधात अनेक तक्रारी असतानाही स्कूलने त्याला प्रमोशन देऊन एक प्रकारे त्यांच्या चुकांवर पांघरून टाकले आहे असा पालकांचा आरोप आहे
Post a Comment