( माणगाव - उत्तम तांबे रा . जि . संपादक )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड रेल्वे पुलाखाली लक्झरी बसणे अचानक पेट घेतला असुन,नागरिकांच्या अथक प्रयत्नाने तसेच अग्निशामक दलामुळे आग आटोक्यात आली असुन या आगीत कोणतेही जिवीत हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे कि शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२.०० च्या सुमारास लक्झरी बस गाडी क्र. एम एच ४७ ए एस ६००३ ही बस बोरिवली हुन मालवणच्या दिशेने जात असतांना कोलाड रेल्वे पुलाखाली आली असता गाडीने अचानक पेट घेतल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच बस चालकाने बस थांबवली व क्लिनरने बस मधून उतरून पाहिले असता गाडीने पेट घेतल्याचे लक्षात आले. यामुळे बसमधील असणारे ३० प्रवाशी, दोन चालक, दोन कर्मचारी यांना खाली उतरण्यात आले.
यावेळी कोलाड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार किशोर जाधव हे उपस्थित होते. त्यांनी ताबडतोब असलेल्या कर्मचारी यांच्या सहकार्याने वरिष्ठ यांच्या आदेशानुसार कंट्रोल रूम अलिबाग, रोहा व कोलाड रेल्वे स्टेशन येथे संपर्क करून घटनेची माहिती दिली. जळीत बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तसेच असंख्य सतर्क नागरिक यांच्या मदतीने धाटाव औद्योगिक येथील अग्निशामक दल तसेच दिपक नायट्रेट फायर टीमला पाचरण करण्यात आले. यामुळे आग आटोक्यात आली.गाडीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असुन मोठा अनर्थ टळला.
Post a Comment