बी.ग्रुपच्या वतीने 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हजारो शालेय विद्यार्थ्यांच्या समवेत व पी. बी. ग्रुपच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये मिठाईवाटप कार्यक्रम संपन्न
सोलापूर - प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप) च्या वतीने श्राविका चौक, बुधवार पेठ, सोलापूर येथे 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गौतम नागटिळक (पॅंथर) व मुन्ना आखाडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आला .त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट )प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी.बी. ग्रुपचे मार्गदर्शक आनंद (दादा) चंदनशिवे यांनी ध्वजारोहण केले तसेच उपस्थित सर्वांच्या वतीने राष्ट्रध्वजास सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत गाऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना मिठाई वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद (दादा) चंदनशिवे यांनी सर्व भारतीय नागरिकांना 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व पुढे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला संविधान दिले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशातील वेगवेगळ्या जाती धर्मातील नागरिकांना संविधानाच्या आधारे एकत्र आणण्याचे काम केले. जगामध्ये आपल्या देशाचे संविधान हे मजबूत आहे अशा प्रकारे संविधानाचे महत्त्व सांगून मनोगत व्यक्त केले.
यावेळी पी.बी.ग्रुप प्रमुख गौतम (महाराज) चंदनशिवे, आरोग्य निरीक्षक जितू मोरे, आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे, जैन गुरुकुल प्रशालेचे प्रसन्न काटकर सर , संजय पंडित सर , चंद्रकांत सोनवणे ,पी बी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे ,मनोज थोरात, उमेश रणदिवे, गोपीनाथ जाधव,रवी काकडे, अक्षय मस्के , रवी सकट ,बालराज जाधव ,रंगा वाघमारे ,सुनील कांबळे ,अनिस सय्यद ,विनय शिरसागर ,प्रभाकर बनसोडे, शिरीष गायकवाड ,संतोष चंदनशिवे ,कैलास वाघमारे, सागर देडे ,अनिल ठोंबर, आशिष पात्रे , सुमित चंदनशिवे ,सतीश आडकुल, जयराज सांगे ,भीमराज मस्के, प्रकाश सोनवणे, प्रथमेश सुरवसे,कैलास वाघमारे ,सुनील कांबळे ,चेतन धाकतोडे, शरद सोनवणे , अजय अंकुश, भारत ढाले ,शाहरुख मुजावर, नागेश आखाडे
व तसेच शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी व पी.बी. ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते....!!!!
Post a Comment