शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

प्लॅस्टिक मुक्ती काँग्रेसचा हातभार मुखेडात हॉटेल चालकांना काचेचे ग्लास सस्नेह भेट देऊन प्लॅस्टिकचा ग्लासचा वापर बंद करण्याची केली विनंती.



.         गुलाब शेख 
             उपसंपादक 
     नांदेड -- मुखेड   मुखेडात  हॉटेलचालकांना काचेचे ग्लास सस्नेह भेट देऊन प्लास्टीकच्या ग्लासचा वापर बंद करण्याची केली विनंती.नागरीकांनी प्लास्टीक कप्सचा वापर टाळण्याचे शहर काँग्रेसने केले आवाहन .
      हॉटेल्स मधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर वाढल्याने कॅन्सरचा धोका व्यक्त करीत शासनाने बंदी आणलेले असताना प्लास्टिक कप वापर टाळा असा संदेश देत प्रजासत्ताक दिनी काँग्रेसने मुखेड शहरातील हॉटेलांना काचेच्या ग्लासाचे सेट सप्रेम भेट दिले. 
     
        शासनाकडून प्लास्टिक बंदी असतानाही विशेषत: हॉटेल्स मधून प्लास्टिक कपमध्ये चहा देण्याचे प्रमाण सर्रासपणे वाढल्याचे दिसून येते.त्यामुळे कॅन्सरसह अरोग्याचा धोका वाढत असून सदर प्लास्टिक कप हद्दपार करण्याच्या उद्देशाने मुखेड शहर काँग्रेस कडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपणवाड आणि शहराध्यक्ष हनमंत नारनाळीकर यांच्या नेतृत्वात मुखेड शहरातील बाराहाळी नाका- आंबेडकर पुतळा - वीरभद्र मंदिर बसस्थानक ते लोखंडे चौक या मार्गातील बहुतांश हॉटेल्सना काचेच्या ग्लासांचा सेट सप्रेम भेट देत प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला. प्रत्येक हॉटेलवर हॉटेलचालकांना आणि नागरिकांना प्लास्टिक कपांच्या वापराचे तोटे व कायदेशीर बाबी समजावून सांगत प्लास्टिक कपांच्या वापर टाळण्याचा संदेश दिला.
      शहरातील बहुतांश हॉटेलना काचेच्या ग्लासांचा सेट दिल्याने शहरात काँग्रेसच्या या अभिनव उपक्रमाचे अभिनंदन होत आहे.काँग्रेसकडून राबवलेल्या या अनोख्या उपक्रमात डॉ.श्रावण रॅपनवाड, हनमंतराव नारनाळीकर सह युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले,शिवसेना शहर प्रमुख शंकर चिंतमवाड, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इम्रान पठाण,युवक काँग्रेसचे एम.आर.गोपनर,गौस सलगरकर,सेवा दलाचे साखरे विद्याधर,इरफान मोमिन,शिवाजी गायकवाड, गजू पाटील मोरे, गोविंद पाटील जाधव,संजय धनजकर, आनंदा गायकवाड,कैलाश बनसोडे आदींसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post