गुलाब शेख
उपसंपादक महाराष्ट्र राज्य
मुखेड दि ७ (प्रतिनिधी) सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबरच शैक्षणिक गुणवत्तेत सुद्धा अव्वल असलेल्या निसर्गसुंदर जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूल मुखेड येथील विद्यार्थी सन २०२४- २५ मध्ये घेण्यात आलेल्या सायन्स व इंग्लिश ऑलंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूलच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह गोल्ड मेडल जिंकले आहे. त्यात सायन्स परीक्षेत इयत्ता पहिलीतून बोडुंगे असद अमीर , मुंडे तनुश्री शिवराज , जायमेहत्रे आरोही नारायण तर दुसरीमधून अवधूत शिवाजी तोटरे , रुद्र गजानन पेड, मानवी संजय घोरपडे , इयत्ता तिसरी मधून कृष्णकांत विलास जुन्ने , द्रोण यादव गव्हाणे , चैतन्य लक्ष्मण शिंदे , इयत्ता चौथीतून आरोही उत्तम गायकवाड , राम अंकुश शिंदे, शैलेश भुजंगराव काटशेव , आराध्या अनिल चौधरी आदी सर्वच विद्यार्थी गोल्ड मेडल साठी पात्र ठरले आहेत.
तसेच इंग्लिश ऑलंपियाड परीक्षेमध्ये इयत्ता पहिली मधून शेटवाड दक्ष दिगांबर , दुसरीमधून मुखेडकर सुविजा विष्णुकांत , सस्त्रमोड समृद्धी तानाजी , तिसरीतून सय्यद रेहान हमीद अब्दुल , जमदाडे रितेश गजानन , शेख आलिशा मैनुदीन , चौथी मधून पाटील दिविजा दिनेश या सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षक , शिक्षिकांचे संस्थाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड , मुख्याध्यापक जगदीप जोगदंड , पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. सर्वच विद्यार्थांनी गोल्ड मेडल जिंकल्यामुळे पालंकात समाधानाचे वातावरण पसरले असून सर्वत्र विद्यार्थ्याचे कौतुक होत आहे.
Post a Comment