शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

गुणवंत खेळाडू तयार करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार

*गुणवंत खेळाडू तयार करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार*
*क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे*
इंदापूर तालुका प्रतिनिधी शिवाजी (आप्पा) पवार

क्रीडा क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.
स्पर्धा परीक्षेतून मिळणाऱ्या यशाएवढेच क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही यश मिळत आहे.त्यामुळे युवा पिढीने खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
          भरणेवाडी ता.इंदापूर येथे मंत्री भरणे यांच्या निवासस्थानी शनिवार दि.११ रोजी राष्ट्रीय पातळीवरील शालेय कुराश (कराटे) स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू व इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी खेळाडूंशी बोलताना क्रीडामंत्री भरणे म्हणाले, सध्याची युवा पिढी खेळामध्ये करिअर शोधत असून येणाऱ्या काळात क्रीडा क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आपण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे.येणाऱ्या काळात आपण राज्यातील ग्रामीण भागामध्ये क्रीडांगणे उभारण्यासह विविध स्पर्धा घेणार आहोत.खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शालेय राष्ट्रीय कूराश स्पर्धेत सुवर्णपदक विजेते सोहम देवकर,श्रावणी सिताप,कपिल जाधव,अजिंक्य नरूटे,जगदीश तोंडे,समृद्धी जाधव यांच्यासह शालेय राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत ब्राँझ पदक विजेते रोहित शिंदे,सुकन्या जाधव राष्ट्रीय धनुर्विद्या सबज्यूनियर स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते स्वरांजली बनसुडे,समृद्धी सुर्यवंशी यांच्यासह बार्शी येथे पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील धावलेल्या संतोष वाघचौरे,गोपीनाथ मोरे व संदीप जाधव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशिक्षक अनिकेत व्यवहारे,जुबेर पठाण,फिरदौस पठाण उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post