संकेत बागरेचा नेर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
शहरात पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
धुळे : चितोड रोड परिसरात राहणाऱ्या गौरव माने या तरुणाचा त्याच्या मित्रानेच किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून केल्याने धुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. हत्याप्रकरणानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. मात्र, किरकोळ वादातून हत्येसारखा गंभीर गुन्हा घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी हत्याप्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या जयेश पाकळे या तरुणाचा शोध घेतला असता तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील 28 नंबर शाळेसमोर एका सिमकार्ड विक्रेत्याला गौरव माने हा दारू पिण्यासाठी पैसे मागत होता, त्यावेळी त्याला त्याचाच मित्र जयेश वाकडेने सिम कार्ड विक्रेत्याला त्रास देऊ नको असे म्हणत समज दिली. यावरुन दोन मित्रांमध्येच वादाची ठिणगी पडली. हत्येच्या घटनेनंतर आरोपी फरार दरम्यान, सिमकार्ड विक्रेत्याला पैसे मागणाऱ्या गौरव माने याने मित्र जयेश पाकळेला व त्याच्या भावाला शिवीगाळ केली. या किरकोळ वादातून जयेश पाकळेने धारदार शस्त्राने गौरव मानेवर वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. धुळे शहर पोलीस संशयीत आरोपी असलेल्या जयेश पाकळे व त्याच्या भावाचा शोध घेत आहेत.
Post a Comment