रणजित दुपारगुडे
प्रतिनिधी
सोलापूर := महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामधील विविध खात्यांच्या अनेक मंत्री महोदय यांचे शासकीय " विशेष कर्तव्य अधिकारी " म्हणुन ( ओ.एस.डी. ) काम केलेले तसेच महाराष्ट्र राज्याच्या ( मंत्रालयीन ) गृह विभागाचे तत्कालीन सहसचिव ( स्वेच्छा निवृत्ती घेतलेले ) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका मतदार संघामधील शिवसेना (उबाठा गटाचे ) अधिकृत उमेदवार म्हणून अतिशय अतितटीच्या लढतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निवडून आलेले नव निर्वाचित लोकप्रिय युवा आमदार सिद्धार्थ खरात तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.सुवर्णाताई खरात ह्या सोलापूर दौऱ्यामध्ये आले होते.
त्यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर शहर जिल्हा शाखेचे बंडखोर नेते राजाभाऊ सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रासकम. संघटनेच्या जिल्हा शाखा सोलापूरचे युवा नेते विजयकुमार भांगे आणि अभ्यासु व कुशल संघटन कौशल्य असलेले बाळकृष्ण पुतळे , यांच्यासह ज्येष्ठ नेते भीमराव लोखंडे यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ खरात यांचा संपत्नीक शासकीय विश्रामगृह , सात रस्ता सोलापूर येथे काल दि. 18/012025 रोजी सायंकाळी सात वाजता शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य असा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्या प्रसंगी शासकीय / निमशासकीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद हे उपस्थित होते !
Post a Comment