*• सुभाषचंद्र बोस हे धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे उत्तम उदाहरण: प्रशांत बाबर*
प्रतिनिधी मोसीन आतार
*स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहराचे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील व युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*
*यावेळी बाबर भावना व्यक्त करताना म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुभाषचंद्र बोस यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे. आज देशात त्यांची १२८ वी जयंती साजरी होत आहे. नेताजींनीच आपल्याला 'जय हिंद'चा नारा दिला होता. सुभाषबाबुंनी दिलेले विचार वाचून आजही तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहते. त्यांचे योगदान कोणताही भारतीय नागरिक विसरू शकणार नाही. परंतु आज त्यांच्या जयंतीदिनी महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधींना पुतळ्याची रंगरंगोटी, डागडुजी तथा सुशोभीकरण करण्यासाठी वेळ, पैसा उपलब्ध करता आला नाही. सध्या पुतळ्याची तसेच आसपासच्या परिसराची अवस्था अत्यंत दयनीय असून याकडे दुर्लक्ष करणे निषेधार्थ आहे.*
*सदरप्रसंगी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, प्रदेश सरचिटणीस वैद्यकीय विभाग राहुल बोळकोटे, प्रदेश चिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, महिला प्रदेश सचिव सिया मुलानी, वंदनाताई भिसे, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष जाविद शिकलकर, शहर उपाध्यक्ष व्ही.डी.गायकवाड, प्रमोद भवाळ, लक्ष्मण भोसले, शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू , सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधोंड, ज्ञानेश्वर सोनवणे, सूर्यकांत शिवशरण आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*
Post a Comment