शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

गवळी वस्तीमधील अतिशय गरीब परिस्थितीत जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कु. संजीवनी ज्योतीराम भोजने आणि कु. सरोजिनी ज्योतीराम भोजने या दोन सख्ख्या बहिणींचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते गौरव

प्रतिनिधी मोसीन आतार 
घरचे अठराविश्व दारिद्र्य, आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडीलाचा गॅरेजचा तोडका- मोडका व्यवसाय, सहा माणसांचं कुटुंब चालविण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड, जिथे घर चालवण्याची चिंता तिथे मुला-मुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा. परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेला दृढनिश्चय कामाला आला आणि कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील आठ पत्र्याच्या घरातील गॅरेज चालक ज्योतीराम भोजने यांच्या दोन्ही मुली कु. संजीवनी ज्योतीराम भोजने आणि कु. सरोजिनी ज्योतीराम भोजने अश्या दोन सख्ख्या बहिणीनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला.
याबद्दल सुधीर खरटमल यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन या दोघी बहिणींचा सत्कार केला. यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सुर्यकांत शेरखाने, युवती शहराध्यक्षा प्रतिक्षा चव्हाण, सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष राकेश सोनी शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू आणि संपूर्ण भोजने परिवार उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post